विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणं पडलं महाग

 

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला घेतले ताब्यात

 

कणकवली : विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी वारगाव येथील एका व्यक्तीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रवीण आत्माराम गुरव (५२, रा. वारगाव – रोडयेवाडी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ हजार ५०० रुपये किंमतीचा ८३ ग्राम गांजा, चिलीम व मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ४.३० वा.च्या सुमारास करण्यात आली.

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गांजा विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वारगाव येथील प्रवीण गुरव यांच्या राहत्या घरी जात तपासणी केली. यात पथकाला ५ पॅक बंद पाऊच मध्ये हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा सदृश्यपदार्थ, एक चिलीम आढळून आला. गांजा व चिलीम जप्त करून प्रवीण गुरव याला ताब्यात घेण्यात आले.

 

याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे हवालदार किरण देसाई यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.