दणदणीत प्रतिसादाने दसरा दिवाळी ठेव योजना समृद्ध
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेला ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. ६३८ ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनेत ८ कोटी ५३ लाखांची गुंतवणूक करून संस्थेच्या ठेवी २९६ कोटी २९ लाखांच्या पल्याड गेल्या आहेत.
या कॅलेंडर वर्ष अखेरीपर्यंत स्वरूपानंद ३०० कोटींच्या ठेवी व २१० कोटींच्या कर्जाचा इष्टांक पूर्ण करेल. संस्थेचा संमिश्र व्यवसाय ५०० करोडचे पुढे गेला असून ५०५ कोटी संमिश्र व्यवसायाची सीमा आज स्वरूपानंद पतसंस्थेने पार केली. ४६ हजार सभासद, २९६ कोटींच्या ठेवी, २०९ कोटींचे येणे कर्ज, १३४ कोटींच्या गुंतवणूका, ४३ कोटींचा स्वनिधी, ९९.३७% वसुली, २५% CRAR, ६१.७३% सीडी रेशो, १७ शाखा सातत्यपूर्ण अ ऑडिट वर्ग असे उत्तम अर्थकारण करणारी पतसंस्था २२ ठेवीदारांच्या आर्थिक व भावनिक गुंतवणुकीचे
केंद्रबिंदू बनली आहे.
सातत्याने ३ दशकांमध्ये सातत्यपूर्ण व्यवहार वृद्धी करत संस्थेने जनमानसात विश्वासार्ह स्थान प्राप्त केले आहे. ग्राहक सेवा त्याला तंत्रज्ञानाची संय्यत जोड देत मोठा ग्राहक वर्ग आपलासा करत स्वरूपानंदची वाटचाल सुरू आहे.
दसरा दिवाळी ठेव योजनेत ८ कोटी ५३ लाखांच्या ठेवी ६३० ठेवीदारांनी संस्थेकडे गुंतवल्या. चालू आर्थिक वर्षात ८ महिन्यात ३२ कोटींच्या नव्या ठेवी पतसंस्थेत गुंतवल्या गेल्या. आगामी काळात नवनवीन योजना उपक्रम घेऊन अधिकाधिक उत्तम ग्राहक सेवा उपलब्ध करून
देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रात होत जाणारे बदल आत्मसात करत अधिक दृतगतीने ५०० कोटी ठेवींचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी आता रचना लावली जाईल अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.












