रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहराच्या राजकीय सामाजिक विकासात्मक जडणघडणीची ऐतिहासिक साक्षीदार असलेली रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत आज जमीन दोस्त करण्यात आली आणि या इमारतीबरोबरच या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये घडलेल्या इतिहास सुद्धा जमीन दोस्त झाला आता या नगरपालिकेच्या या इमारतीमधून झालेल्या कारभाराच्या आठवणी फक्त जुन्या ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधींच्या कडे राहिले आहेत एक मे पासून रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार हा याच आवारात उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे रत्नागिरी नगरपरिषद आपल्या वैभवशाली 150 वे वर्ष साजरे करत आहे आणि याच वर्षी या नगरपालिकेचा कारभार या नव्या इमारतीमध्ये सुरू होत आहे इथूनच वाढत जाणाऱ्या रत्नागिरी शहराचा कारभार आता हाकला जाणार आहे











