राजापूर (वार्ताहर): राजापूर अर्बन बँकेच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहता न आल्यामुळे माजी आमदार गणपत कदम, नाटककार गंगाराम गवाणकर यांनी मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात भेट देत बँकेच्या सर्व संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आणि त्यांच्या सर्व टीमचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले .
येथील राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा नुकताच शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न झाला. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबविण्याबरोबरच राजापूरवासियाना सहकार क्षेत्रातील माहितीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानीही बँकेने दिली.
याच वेळी ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करीत आपला यथोचित सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करणारे आणि बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देणारे पत्र देत अभिनंदन केले.
यावेळी बँकेचे संचालक अँड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांच्यासह, प्रसन्न मालपेकर, पत्रकार राजन लाड, सुनील करगुटकर राकेश दांडेकर, श्री म्हात्रे यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.











