भारतीय टपाल खात्याची विश्वासार्हता विशिष्ट कार्यपद्धतीमुळे आजही टिकून – श्रीराम वायाळ

साळशी डाकपाल अनिल गावकर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा कार्यक्रम 

शिरगाव (वार्ताहर)   भारतीय टपाल खात्याची निर्मिती सन १८५३ मध्ये झाली. त्यापासून त्याची प्रगतीकडे वाटचाल असून त्याची विश्वासार्हता विशिष्ट कार्यपद्धतीमुळे तसेच ती नियम व काटेकोरपणा यामुळे टिकून आहे.व पुढेही टिकून राहील. ग्रामिण भागात श्री गावकर यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत प्रामाणिक सेवा दिली हे अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन देवगडचे डाकनिरीक्षक श्रीराम वायाळ यांनी साळशी येथे केले.

साळशी येथील डाकपाल अनिल अनंत गावकर यांच्या ४१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने साळशी डाकघर कार्यालय येथे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

अनिल गावकर यांनी सन १९८२ पासून साळशी येथे वयाच्या २४ व्या वर्षी अवघ्या १२० रुपये मानधनावर डाकपाल म्हणून नोकरीस रुजू झाले व त्यांनी सलग ४१ वर्षे प्रामाणिक सेवा केली.त्यानी आपल्या सेवाकाळात ग्रामस्थांशी सलोख्याचे व विश्वासाचे नाते जपुन सामाजिक बांधिलकी जोपासली.ते वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले याबद्दल त्यांचा व त्यांची पत्नी सौ.अर्चना यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेेच भेट वस्तू देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या

 

यावेळी भारतीय टपाल सेवा, कार्यालय देवगड, ग्रामपंचायत साळशी, लोकमान्य मल्टीर्पपज को.ऑफ सोसायटी शाखा शिरगाव, अमरज्योत क्रिडा मंडळ,साळशी,श्री लाडगांवकर परिवार व नातेवाईक, हितचिंतक यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारप्रसंगी अनिल गावकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मी यशस्वी कामकाज करु शकलो असे सांगून त्यांचे ऋण व्यक्त केले.

यावेळी साळशी सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर, म.गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर साळसकर, माजी प स सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच अनिल पोकळे, वैभव साळसकर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या .

यावेळी उपस्थित मान्यवरासह, देवगडचे डाकआवेशक रविकांत लिंगायत, आयनलचे डाकपाल आनंद साटम व पोस्टमन सुनील घाडी, कुवळे पोस्टमन सखाराम ( दत्तू) घाडी , असलदे पोस्टमन रमाकांत गावकर, साळशी पोस्टमन संकेत कदम, मानसिंग लाड, अनंत नाईक, पोलिस पाटील कामिनी नाईक ,वैभव घाडी,पंढरी परब, विक्रांत नाईक, श्री.लाडगांवकर परिवार, व नातेवाईक हितचिंतक ग्रामस्थ आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गावकर यांनी तर प्रास्ताविक अनिल पोकळे यांनी केले.आभार योगेश गावकर यांनी मानले.