खेड (प्रतिनिधी)कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे जनसंपर्कप्रमुख साहिल हुंबरे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आगारप्रमुख दीपक चव्हाण व प्रवीण उबाळे यांच्या सहकार्याने ७ नोव्हेंबरपासून खेड-भांडुप बससेवेच्या वेळेत बदल केला आहे. यापूर्वी सकाळी १०.४५ वाजता सुटणारी ही बस आता दुपारी १२ वाजता सुटेल. भांडुप स्थानकातून पूर्वीप्रमाणे रात्री ८.४५ वाजता सुटेल.
बस पोलादपूर, महाड, माणगाव, पनवेल, कामोठे, कोकण भवन, नेरूळ फाटा, कळवा, ठाणे आदी बसस्थानकात थांबेल. या बससेवेचे ऑनलाईन आरक्षण देखील खुले आहे. या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंपर्कप्रमुख हुंबरे यांनी केले आहे.









