‘आम्ही कणकवलीकर’ यांच्यावतीने आयोजन
कणकवली | वार्ताहर : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दरवर्षी कणकवली पोलिस ठाणे येथे सर्व नागरीक एकत्र येत श्रद्धांजली वाहतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘आम्ही कणकवलीकर’ व कणकवली तालुक्यातील नागरीक २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी ‘वंदेमातरम’ ची प्रतिकृती साकारून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहीली. तसेच यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाचे वाचन करून शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘आम्ही कणकवलीकर’ यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, प्रज्ञा खोत, बाळू मेस्त्री, मनोहर पालयेकर, दादा कुडतडकर, दादा कोरडे, संजय मालंडकर, सादिक कुडाळकर, सिद्धी वरवडेकर, वसुधा माने, श्रद्धा हजारे, संदीप सावंत, रंजन चिके, दिलीप साटम, विलास डगरे, प्रा. मोहन कुंभार, विजय घाडीगांवकर, सुगंधा देवरुखकर, चंद्रकांत चव्हाण, प्रमोद लिमये, सखाराम सकपाळ, लवू वारंग, सुनिल काणेकर, डॉ. विद्याधर तायशेट्ये, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, कमलाकर तांबे, जगदिश राणे, भालचंद्र पेडणेकर, रविंद्र डगरे, ऋता खोत, राजेंद्र पेडणेकर, अनुप वारंग, डॉ. सुहास पावसकर, अॅड. विलास परब, प्रा. राजेंद्र मुंबरकर, नामानंद मोडक, बाळू पारकर, शीतल मांजरेकर तसेच पोलिस उपनिरीक्षक रवी शेडगे, शरद देठे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, विनोद चव्हाण, आर. के. पाटील, चंद्रकांत माने, स्नेहा राणे यांच्यासह कणकवलीतील नागरीक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना सिद्धी वरवडेकर यांनी संविधानाची शपथ दिली. तर धाकू तानवडे, प्रज्ञा खोत व पोलिस उपनिरीक्षक रवी शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले.











