खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव नजीक रविवारी सकाळी रोलरखाली चिरडून राहुल रंगराव पवार (४२, रा. भडगाव – खोंडे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
हा तरुण आपल्या ताब्यातील रोलर घेऊन खाडीपट्ट्यातील शिर्शी येथे भरवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्याच्या मैदानाचे सपाटीकरण करण्यासाठी जात होता. नांदगावनजीक चढ चढत असताना गिअर टाकल्यानंतर रोलर थेट माघारी फिरला. यानंतर त्यांनी बचावासाठी रोलरमधून पाठीमागे उडी मारली असता पुढील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ पोलीस यंत्रणा यांच्यासह निखिल नलावडे, संतोष नलावडे. आसिफ काझी, विनय तोडणकर घटनास्थळी पोहोचले. राहुल पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.











