दुकानांच्या पाट्या मराठीत करा :
भिल्लवाडी ग्रुपची मागणी
मळगाव बाजारपेठेतील दुकानदारांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत करणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही मळगाव गावातील काही दुकानांच्या पाट्या ह्या इंग्रजी भाषेमध्ये लावलेल्या आहेत. त्या त्वरित मराठी भाषेत करण्यात याव्यात अशी मागणी मळगांव येथील भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी दुकान मालकांना दिले आहे. दुकानदारांनी लवकरात लवकर आपल्या नावाच्या पाट्या मराठीत कराव्यात असे या निवेदनात म्हटले असून त्यांना यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व पाट्या मराठीत करण्याबाबतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.










