नाडन गावातील विकास कामांचे भूमिपूजन

देवगड : प्र.जि.मा. १० ते नाडण पुजारेवाडी, वारीकवाडी मार्ग ग्रा. मा. -५५ खडीकरण व डांबरीकरण करणे या दहा लाख रुपये खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे काम जिल्हा वार्षिक योजना या योजनेतून घेण्यात आले आहे

जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, प्रकाश राणे, संजय बोंबडी, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, अरीफ बगदादी, बंड्या नारकर, मकरंद जोशी पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे व अन्य भाजपा पदाधिकारी अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते