माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या राज्य महामंडळाचे ७ रोजी सावंतवाडीत राज्य अधिवेशन

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या राज्य महामंडळाचे राज्य अधिवेशन ७ जानेवारी रोजी सावंतवाडी येथे आयोजित केले असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल राणे सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या राज्य महामंडळाचे राज्य अधिवेशन ७ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील जिमखाना मैदान येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आयोजित केले असून या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. विनायक राऊत, माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत, आम. नितेश राणे, आम. वैभव नाईक, आम.रमेशदादा पाटील, आमदार विक्रम काळे आम. जयंत आसगावकर, आम. रवींद्र धंगेकर ,आम. निरंजन डावखरे, आम. सत्यजित तांबे, आम ज्ञानेश्वर म्हात्रे, कौस्तुभ गावडे उपसंचालक महेश चोथे, संगीताताई शिंदे अध्यक्ष शिक्षण संघर्ष संघटना, अश्विनी करण नगरसेवक पुणे, बोधी पोळ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अर्चना घारे परब माजी उपाध्यक्ष पुणे मध्यवर्ती बँक, वामन तर्फे अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, उमेश सुकी मुख्याध्यापक शिरोडा हायस्कूल, तसेच राज्य महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, उपाध्यक्ष रवी गवळी, सरिता कुलकर्णी, प्रिया पवार, खैरूद्दीन सय्यद, श्रीधर गोंधळे, देविदास पंडागळे मुंबई विभाग, संजय कावळे संभाजीनगर विभाग, ज्ञानेश्वर चापूले लातूर विभाग, गजानन नानचे कोल्हापूर विभाग, गोवर्धन पांडुळे पुणे विभाग, डी.पी. महाले नाशिक विभाग, विजय टाले अमरावती विभाग, जीवनदास सार्वे नागपूर विभाग, श्रीकांत पावणे प्रसिद्धीप्रमुख, सुखदेव कंद कोषाध्यक्ष, रामचंद्र केळकर हिशोब तपासणीस, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ, प्रास्ताविक, पाहुण्यांचे मनोगत, स्नेहभोजन, अहवाल वाचन, अध्यक्ष भाषण प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आणि अधिवेशन चर्चासत्र असे अधिवेशन व चर्चासत्र होणार आहे तरी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी सदर अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन अनिल राणे अध्यक्ष, सुहास देसाई उपाध्यक्ष गजानन नानचे सचिव, वैभव केंकरे आयोजक सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी आवाहन केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.