बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील विशेष कार्यकारी अधिकारी (जेपी) पदाच्या नियुक्त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. यात रामचंद्र दत्ताराम वाळके, संदेश महादेव पावसकर आणि प्रियांका पांडुरंग नाटेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली असून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी नागरिकांनी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











