शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ चा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : मंत्री दीपक केसरकर

शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन थाटात संपन्न

३६ जिल्ह्यातील ५ हजारहून अधिक कर्मचारी उपस्थित

सावंतवाडी । प्रतिनिधी : उच्च शिक्षणविभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०/२०/३० तसेच २४ च्या प्रस्ताव मंजूरीसाठी अर्थ विभागाकडे त्वरित पाठपुरावा करेन. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या संदर्भातही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचा दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक राहीला आहे. आम्ही नेहमीच सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अर्थ विभागाने प्रस्ताव मंजूर केला असल्यास अर्थ विभागाकडे जाऊन २४ चा लाभ मिळवून देण्यासाठी मुंबईत गेल्यावर प्रयत्न करेन, असे स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.