कुडाळ येथील शेतकरी चंद्रकांत काजरेकर यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

जगातील सर्वात मोठे आंब्याचे पान- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश

 स्वप्निल कदम l कुडाळ :     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती व बागायतदार श्री चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे. कुडाळ चे सुपुत्र चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर जगातील रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत.

निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे 32 वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आपली आंबा व काजू बागायतीचीआवड जोपासत असताना श्री काजरेकर यांना आपला हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्म पर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा व डॉक्टर नुपूर आणि जावई श्री धीरज व डॉ देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पूनर्तपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ.श्री.विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. श्री रवींद्र यशवंत ठाकूर,प्राध्यापक श्री उमेश मिलिंद कामतव प्राध्यापक श्री दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर,डॉ.नालंदा,डॉ. नुपूर, जावई श्री धीरज,डॉ.देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.

जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे. जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद श्री चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली व कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदले गेले आहे .या पानाची लांबी 55.6 सेमी रुंदी 15.6 cm आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपाऱ्या व काजूची रोपे तयार करून नर्सरी चा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी,मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे.दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

फोटो चंद्रकांत काजरेकर फोटो चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेत आढळलेले जगातील सर्वात मोठे आंब्याचे पान