वार्ताहर l पाली : पाली येथील डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेमध्ये आज थोर भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेच्या मुख्याध्यापिका नुतन कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वन आणि प्रतिमापूजन करण्यात आले. या दिनाचे महत्त्व प्रशालेच्या सहशिक्षिका स्नेहल भागवत यांनी केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून थोर भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी खो-खो आणि कबड्डी सामने खेळविण्यात आले.
यानंतर आज मकरसंक्रांत संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात. या सणाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये पतंगोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पतंग निर्मिती स्पर्धा आणि पतंग उडवण्याची स्पर्धा घेण्यात आली. प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या पतंगोत्सवामध्ये सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नुतन कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली. तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्ग यांचे उपयुक्त सहकार्य लाभले.










