खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील साखरोली येथील पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या ड्रीम लाईन मोटर्स, इलेक्ट्रिक टू-व्हिलर
गोडावूनला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. येथील नगरपरिषदेच्या अग्निशमक दलास कळवल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचून कर्मचाऱ्यांनी अवघ्या तासांतच आग आटोक्यात
आणल्याने अनर्थ टळला.
या ठिकाणी आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमक केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, श्याम देवळेकर, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ, जयेश पवार, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधन पवार, गजानन जाधव आदींनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोदामामधील साहित्याचे नुकसान झाले आहे.











