माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन आरवली दशक्रोशीतील ब्राह्मण युवकांचा असलेल्या परशुराम युवा मंचाच्या सदस्यांचा नुकताच अभ्यास दौरा झाला.दरवर्षी एक अभ्यास दौरा काढला जातो.
यावर्षी पुणे जिल्ह्यातील भिलवडी येथे असलेल्या चितळे दूध डेअरी ला परशुराम युवामंचाच्या सदस्यांनी भेट दिली.चितळे दूध डेअरी मधील विविध दूध प्रक्रिया समजून घेतली.दुधापासून तयार केले जाणारे विविध पदार्थ व अन्य पदार्थांच्या प्रक्रियेविषयी सदस्यांनी जाणून घेतले.दिवसेंदिवस वाढत असलेली दूध उत्पादनाची गरज व त्यातील रोजगार समजून घेतला.भिलवडी येथील चितळे दूध प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ,नरसोबाची वाडी व खिद्रापूर येथे भेट दिली.यावेळी परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष शशिकांत साठे व सेक्रेटरी संजय भागवत आदिंसह एकूण १७ सदस्य या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.











