माखजन इंग्लिश स्कूल येथे १०वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना एस एस सी च्या परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.मार्गदर्शिका म्हणून रातमागिरीच्या सौ विभावरी करमरकर उपस्थित होत्या.

या प्रसंगी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी त्यांचे स्वागत केले तर शिक्षक ओंकार नामजोशी यांनी त्याचा परिचय करून दिला.सौ विभावरी करमरकर यांनी विज्ञान १ व गणित विषयी मार्गदर्शन केले.एस एस सी च्या परीक्षेला सामोरे जाताना कोणती दक्षता घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन केले.विज्ञान व गणित विषयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांविषयी मार्गदर्शन केले.तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.