महिलेची ओळख पटली नाही : महिले बाबत काही माहिती मिळाल्यास मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेटी येथे एक वृद्ध महिला मृत अवस्थेत शनिवारी सकाळी दिसून आली. या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तरी या वृद्ध महिले बाबत काही माहिती असल्यास मालवण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.












