ओझर विद्यामंदिर येथे ” हिंद दी चादर” उपक्रमाची सांगता!

राष्ट्रीय विज्ञान दिनही उत्साहात साजरा

मसुरे | झुंजार पेडणेकर
भारत सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभर संपन्न होत असलेल्या शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षाच्या निमित्ताने कांदळगाव येथील मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर या अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये गेले पंधरा दिवस अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी देव, देश, धर्म, संस्कृती आणि समाज यासाठी दिलेले बलिदान व परकीय आक्रमक औरंगजेब याने त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या इत्यादीचा संपूर्ण इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या संकल्पनेनुसार शाळेमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित बहुपर्यायी प्रश्न परीक्षा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य फेरी इत्यादी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्याप्रती आदर त्याचप्रमाणे अन्याय, अत्याचार व जुलूम याविरुद्ध त्यांनी उभारलेला लढा व त्यांनी केलेले बलिदान यांचे सदैव स्मरण होण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांचा समारोप राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या कार्यावर आधारित भंडारी जुनियर कॉलेज मालवणचे प्राध्यापक पवन बांदेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य श्री नंदकुमार राणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव, साहाय्यक शिक्षक श्री. अ. अ. शेर्लेकर, श्री. एस. जे. सावंत, शिक्षिका श्रीमती सुनयना पवार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी

उपस्थित होते. याप्रसंगी संस्था चालक मा. श्री नंदकुमार राणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी. जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक शिक्षक श्री. प्रवीण पारकर यांनी केले तर आभार श्री पी.के. राणे यांनी मानले.