सावंतवाडी । प्रतिनिधी : अयोध्येतील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वभूमीवर मळगांव येथील श्री देव भूतनाथ मंदिरात सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सोमवरी सकाळी ८ वा. श्री देव भूतनाथ मंदिरात पूजन, सकाळी ८.३० वा.
श्री राम प्रतिमा पूजन, सकाळी ९ ते १२.३० वाजेपर्यंत श्री राम जप व गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
दरम्यानच्या काळात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
तर दुपारी १२.३० वाजता
कारसेवक स्मरण, त्यानंतर दुपारी १२.४५ वा. ते १.१५ वाजेपर्यंत महाआरती होणार आहे. दुपारी १.३० वाजल्यानंतर
उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात दुपारी ३.३० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत गावातील महिलांच्या फुगड्या, संध्याकाळी ६ वाजता ‘महा दिपोत्सव ‘ व त्यानंतर रात्री स्थानिक मंडळांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत.
Sindhudurg










