भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम संपन्न
मालवण : अयोध्या नगरी येथे संपन्न होत असलेल्या प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळगांव हुमरोस वाडी येथील ग्रामस्थांनी पावणाई मंदिरात श्री रामांच्या प्रतिमेला व पावणाई देवीचे पूजन करुन मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.












