पारंपारिक चित्र देखावे ठरले आकर्षण
शिरगाव (वार्ताहर) अयोध्या येथील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्ताने शिरगाव येथे काढण्यात आलेल्या भव्य शोभा याञेत जय श्री रामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून राममय झाला.
जय श्रीरामच्या जयघोषात , डोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पारंपारिक वेशभूषेत शिरगाव ग्रामपंचायत येथून शिरगाव बाजारपेठेतून शिरगाव रामनगर येथील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायाञा काढण्यात आली.तेथे गेल्यावर राममंदिरात महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले.

या शोभायात्रेत केंद्र शाळा शिरगाव, आंबेखोल शाळा, निमतवाडी शाळा, राकसवाडी शाळा, चौकेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले रामायणावर आधारित पौराणिक चित्र देखावे आकर्षण ठरुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
तसेच शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केली होती.
दरम्यान या शोभा याञेत माजी आमदार प्रमोद जठार हे देवगडला जात असताना काही वेळ सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत शिरगाव परिसरातील ग्रामस्थ, रामभक्त, महिला,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संखेने सहभागी झाले होते












