लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली येथील श्रीराम विद्यालय तु.पु शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय यामाहा ट्रेनिंग स्कूल येथे व्याख्यानमाला आणि हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाले. दिनांक २४ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक शाळेत राष्ट्रीय बालिका दिन अत्यंत उत्साह साजरा झाला .या दिनाचे औचित्य साधून लांजा दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी. आर भोसले ,वकिल संपदा मुळ्ये , सीनियर क्लार्क सौ गवळी, ज्युनिअर क्लार्क वाडेकर शरद चव्हाण आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. न्यायधिश पी.आर.भोसले यांनी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गांगण यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ संपदा मुळे यांनी त्यांनी कोणकोणते कायदे आहेत किंवा एखाद्या वेळेस कोणते संकट आले तर त्याच्याशी कसा सामना करायचा हे सांगितले मोबाईलचे अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तर प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश श्री भोसले यांनी मार्गदर्शन करताना मुलांशी चांगला संवाद साधला .मुलगी ही अबला नसून सबला आहे त्याचबरोबर महिलांनी सक्षम असायला हवे हे सांगितले मोबाईल आपल्यासाठी कसा घातक आहे हे सांगितले. या दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जाधव यांनी केले .आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक माननीय बंडगर यांनी मानले.










