महाराष्ट्राचे विनोदवीर व नामवंत पार्श्वगायक यांच्या सहभागातून उद्या मालवणात ‘जल्लोष’

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांचे सौजन्य : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 36 वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा प्रतिवर्षाच्या परंपरेस अनुसरून यंदा सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या आयोजकत्वखाली बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी मोठ्या दिमाखात मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे संपन्न होत आहे. मालवण व्यापारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने यावर्षी मेळाव्यासोबत 29 व 30 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सोमवार 29 जानेवारी रोजी सायं. 4 वा. मालवण देऊळवाडा नाका येथून भव्य मोटरसायकल रॅली. सायं. 5 वा. व्यापार प्रदर्शनी व मेळावा सभामंडप याचे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन. सायं. 6 वा. निलेश राणे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे विनोदवीर यांच्या सहभागतून ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे, आशिष पवार, श्रेया बुगडे तसेच लिटिल चॅम्प फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांचा विविधरंगीं कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर 30 जानेवारी सायं. 7 वा. महानाट्य ‘अयोध्या’ सादर होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून अनेक मान्यावर यांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वार्षिकउत्सवास सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे. असे आग्रहाचे निमंत्रण व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, मालवण अध्यक्ष उमेश नेरूरकर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर यांनी केले आहे.