मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा जत्रोत्सव २५ जानेवारीपासून सुरू झाला असून आज २९ जानेवारी रोजी या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आई भगवतीचे आशीर्वाद घेतले. शनीवारी रात्री आमदार नितेश राणे यांच्या पत्नी सौ नंदिता नितेश राणे,कु. निमिष नितेश राणे व परिवार यांनी श्री भगवती देवीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी देवी भगवती देवस्थानच्या वतीने माजी सरपंच सौ. साक्षी गुरव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परूळेकर, विश्वस्त कृष्णा सावंत, पुरूषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकरमनोहर मुणगेकर, आनंद घाडी, माजी विश्वस्त देवदत्त पुजारे,सुनील सावंत, सुरेश बोरकर, यशवंत मुरकर, कृष्णकांत गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











