मनसेच्या पाठपुराव्याला यश
न्हावेली l प्रतिनिधी :न्हावेली आरोस तिठा ते कोंडूरे या रस्त्याच्या डांबरीकरनाला सुरवात झाली आहे .
हा सहा किलोमीटरचा रस्त्या खड्डेमय झाला होता, वाहन धारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मनसे कार्यकर्ते तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, चेतन पार्सेकर, ,राज धवणं, हेमचंद्र (बाळू) सावळ ,अमोल पार्सेकर, संदेश सावंत ,प्रथमेश नाईक, नवनाथ पार्सेकर , संदेश सावंत आदीनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन उपअभियंता श्री वैभव सगरे याची भेट घेत लक्ष वेधले होते.
मनसेच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याच्या डांबरीकरनाला सुरवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांकडून व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.












