पुणे पिंपरी चिंचवड येथील मोटे दांपत्याकडून परुळे जि. प. शाळा नंबर ३ मधील विद्यार्थ्यांना ‘भगवत गीता’ ग्रंथाचे वाटप

परुळे : प्रतिनिधी : शाळांच्या माध्यमातून मुलांना आपल्या धार्मिक ग्रंथांची ओळख व्हावी या उद्देशाने पुणे पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आणि टाटा मोटर्स कंपनीतील डेप्युटी जनरल मॅनेजर महेंद्र रघुनाथ मोटे व त्यांची पत्नी कविता महेंद्र मोटे यांनी आपला पवित्र ग्रंथ ‘भगवत गीता’ परुळे जिल्हा परिषद शाळा नंबर ३ मधील विद्यार्थ्यांना वाटप केला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, सानिका परुळेकर यासह विद्यार्थी उपस्थित होते. श्री. मोटे दाम्पत्य हे बऱ्याच कालावधी पासून हा उपक्रम राबवित आहेत. दर महिना ५०० ग्रंथ ते खेडोपाडी व शहरी भागात वितरीत करतात. या ग्रंथात जीवनाचे सार सांगितले आहे, त्याची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. श्री. मोटे दांपत्य आपल्या कोकण फेरी वेळी परुळे शाळा नंबर ३ येथे थांबून त्यांनी शाळेची माहिती घेतली व हा उपक्रम राबविण्यात येत आहे याबाबत कल्पना शाळेला दिली. त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.