मुख्यमंत्री यांच्या निर्देशनुसार उद्योगमंत्री उदय सामंत राहणार उपस्थित
वेंगुर्ले : दाजी नाईक
एस.टी.कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या ३२ दिवसापासून सेवा संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे सरचिटणीस सतीशदादा मेटकरी हे प्रलंबित १६ मागण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणला बसले आहेत. आज या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत उद्या ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई येथे बैठक बोलावली आहे, अशी माहिती एस टी कामगार आघाडी कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर यांनी वेंगुर्ले येथे दिली.
भाजपा वेंगुर्ले कार्यालयात आज सायंकाळी कामगार आघाडी कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत कामगार आघाडी सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अशोक राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री संतोष भाट, विभागीय उपाध्यक्ष श्री भरत चव्हाण, विजयदुर्ग आगार सचिव श्री रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार सचिव श्री दाजी तळवणेकर, श्री भावू सावळ, श्री मनोज दाभोळकर, श्री अनंत झोरे, श्री विनायक दाभोलकर, श्री योगेश प्रभुखानोलकर, श्री रामचंद्र पालकर इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान उद्याच्या बैठकीला प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून आमदार गोपीचंद पडळकर, आमदार श्री सदाभाऊ खोत उपस्थित राहून कामगारांना आनंदाची बातमी देणार आहोत. असेही त्यांनी सांगितले. मात्र सतीशदादा मेटकरी यांचे उद्या ३३ व्या दिवशी बैठकी दरम्यान निर्णय होई पर्यंत उपोषण चालू ठेवणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.











