संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील ओम श्री डूगवेश्वर गणेशवाडी मित्र मंडळ डूगवे यांच्या वतीने श्री माघी गणेश उत्सव सोहळा आणि मंडळाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम सोमवार दिनांक 12 ते 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 12 रोजी सकाळी ९ वाजता होम हवन, दुपारी १२ वाजता ह भ प विजय बुवा कदम देवखेरकी यांचे कीर्तन, सायंकाळी ४ वाजता लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, रात्री ७.३०वाजता डुगवे गणेशवाडी ग्रामस्थ मुंबई यांचे भजन, रात्री ९ वाजता उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण सोहळा, रात्री १० वाजता आई चौथाई देवी नाट्य नमन मंडळ निवळी चिपळूण यांचा बहुरंगी कार्यक्रम होईल.
मंगळवार दिनांक १३ रोजी सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता जन्मकाळ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ वाजता ह भ प रमणबुवा भडवळकर घोणसरे यांचे कीर्तन, दुपारी १.३०वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ५ ते ६ वाजता मिरवणे अंगणवाडी महिला मंडळ सुस्वर भजन, रात्री ७ वाजता श्रीची पालखी मिरवणूक, आणि रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्डिंग डान्स असा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष चंद्रकांत तांडकर यांनी केले आहे.








