लांजा( प्रतिनिधी) आंजणारी शिखरेवाडी येथील त्या बेपत्ता ६८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी मठ असोडे येथील धरणात सकाळी ७.३० वाजता आढळून आला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथील सिताराम तानू शिखरे (वय ६८) ही व्यक्ती दिनांक १२ फेब्रुवारी पासून बेपत्ता झाली होती .सिताराम शिखरे हे गेले अनेक वर्षे वेडसर झाले होते. त्यामुळे ते घर तसेच आंजणारी स्टॉप आदी परिसरात जिकडे फिरत असत. मात्र दिनांक १२ फेब्रुवारी ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता. आज शनिवारी १७ फेब्रुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास असोडे येथील ग्रामस्थांना असोडे धरणात त्यांचामृतदेह आढळून आला होता.
याबाबत लांजा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर लांजा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सिताराम शिखरे यांचा तो मृतदेह असल्याचे पुतण्या संजय शिखरे यांनी सांगितले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









