खेडचे डॉ. उपेंद्र तलाठी सर्जन ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीत

खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील मधुसिद्धी हॉस्पीटलचे डॉ. उपेंद्र तलाठी यांची असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेच्या कार्यकारिणीत प्रतिनिधी संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

२०२४ ते २०२७ या कार्यकाळासाठी कोकण विभागातून त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. रोटरी स्कूलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन व रोटरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष असलेले डॉ. उपेंद्र

तलाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे