हळवल ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रभाकर राणे विजयी

६ विरुद्ध ४ अशी झाली लढत ; ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव

कणकवली : हळवल ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर राणे आणि उबाठा पुरस्कृत उमेदवार अनंत राणे हे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत प्रभाकर राणे हे ६ मते घेऊन विजयी झाले तर अनंत राणे यांना ४ मते मिळाली, त्यावेळी उपस्थितानी प्रभाकर राणे यांचे अभिनंदन केले., त्यावेळी उपस्थित, सरपंच अपर्णा चव्हाण, संतोष गुरव, प्रदिप गावडे, शिवा राणे, सचिन ठाकूर सानवी गावडे, रसिका गुरव, भारती तांबे, आदी उपस्थित होते.