व्यवसाय म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर सुनील आठवले यांची ओळख वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आहेत मात्र समाजसेवक म्हणूनही आहे. कोणत्याही सत्काराची अथवा पद व मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणे हे व्रत त्यांनी गेली 40 वर्षे सुरू ठेवले आहे. जो वैद्यकीय उपचारासाठी अडला आहे.. त्यांच्यासाठी डॉक्टर सुनील आठवले हा देव आहे. आज त्यांचा वाढदिवस ! या निमित्ताने घेतलेला हा आढावा..
डॉक्टर सुनील आठवले गेली सुमारे 40 वर्षे र्देवगडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असून आत्तापर्यंत आपल्या लाईफलाईन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 1000 पेक्षा अधिक वैद्यकीय शिबीरे घेउन सुमारे 30000 पेक्षा अधिक रुग्णांच्या मोफत तपासण्या व उपचार केले आहेत.
तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायिकांसाठी 1000 पेक्षा अधिक वैद्यकीय चर्चासत्रे आयोजित करून ज्ञानाचे भांडार उभे केले आहे. वैद्यकीय व्यवसायिकांच्या अनेक संघटनांचे ते मार्गदर्शक आहेत वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर त्यांनी प्रयत्न केले आहेत त्याच बरोबर वैद्यकीय व्यवसायिकांसाठी मेडीफेक्ट हे अनियतकालिक, डिजीटल लायब्ररी चर्चासत्रे याचबरोबर रूग्णांसाठी अॅम्ब्युलंस सेवा, नेत्रशिबीरे, रक्तदान शिबीरे, दंत शिबीरे आयोजित केली आहेत. टी बी च्या रुग्णांसाठी तालुक्यामध्ये 25 पेक्षा अधिक डॉटस केंद्रे स्थापन केली असून या केंद्रांमार्फत रुग्णांना टी बी वर मोफत उपचार व मोफत औषधे उपलब्ध केली आहेत. शालेय वा विद्यार्थी वा सर्वसामान्य नागरिकांसाठी समाजात आरोग्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत, तर साथीच्या आजाराच्यावेळी अथवा इतर आपत्तेच्यावेळी शासनाला सहकार्य केले आहे.
तालुक्यातील 1000 ब्लड्ग्रुपधारकाची सूची तयार केली आहे.. सुरवातीच्या काळात काही वर्षे वारणा आरोग्यच्या माध्यमातून रुग्णांना सोनोग्राफी तज्ञांमार्फत सवलतीच्या दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून दिली होती. जन्मतः हृदयाचा दोष असलेल्या बालकांची मोफत तपासणी वां सवलतीच्या दरात उपचार तसेच स्माईलट्रेन योजनेंतर्गत लहान मुलांवरील मोफत शस्त्रक्रिया याच बरोबर टेलीमेडीसीन व टेलीईसीजीची सुरुवात देवगड्मध्ये पहिल्यांदाच केली आहे .
तसेच बायोमेडीकल वेस्ट यासाठी जनजागृती करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. देवगडमधील कोणत्याही रुग्णाला अडीअडचणीच्यावेळी पैशाची अपेक्षा ना बाळगता त्यांनी घरोघरी जाउन मदत केली आहे. रात्री अपरात्री रुग्णाला केव्हाही सेवा त्यांनी नाकारली नाही किंबहुना त्यांनी रात्रीअपरात्री सेवा दिली नाही असा रुग्णही मिळणार नाही .त्यांच्या सहकार्यानी स्थापन झालेल्या देवगड तालुक्यातील पहिल्याच इंग्लीश मिडीयम स्कूलचा फायदा शेकडो विद्यार्थी घेत आहेत. इतिहास, विज्ञान या विषयावर त्यांचे अनेक लेख वा आकाशवाणीवर भाषणे झाली असून विंड एनर्जी या विषयावर लिहिलेले तांत्रिक पुस्तक एकूण 12 भारतीय भाषातून प्रसिध्द झाले आहे .देवगडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. स्वरगंध वा विविधा या संस्थामध्ये त्यांचा संपूर्ण सहभाग होता.या सामाजिक कार्याची शासनाने नोंद घेउन 2013-14 सालासाठी हनीमान हा पुरस्कार जाहीर केला व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता
संपूर्ण आठवले कुटुंबीय हे वैद्यकीय व्यवसायाशी जोडलेले डॉक्टर सुनील आठवले यांचे वडील डॉक्टर भा.वा आठवले हे संगीततज्ञ नामवंत लेखक तसेच वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जुन्या पिढीत प्रसिद्ध होते. पत्नी डॉक्टर मंजुषा आठवले या सुनील आठवले यांच्याबरोबरच खांद्याला खांदा लावून वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करतात
त्यांचे चिरंजीव डॉक्टर तन्मय आठवले व तन्मय यांच्या पत्नी डॉक्टर रिया आठवले आता प्रतीथयश वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत असताना त्यांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा अवलंब करून वडिलांचा आदर्श सुरू ठेवला आहे सुनील आठवले यांना साठाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा !












