अवनी स्पोर्ट्स पेंडूर उपविजेता ; आप्पा इलेव्हन चौके तृतीय तर डीसीसी वायरी चतुर्थ ; कट्टा गुरामनगरी काराणेवाडी मैदान येथे आयोजन
अमित खोत | मालवण : भाजपा युवा मोर्चा मालवण यांच्या वतीने कट्टा गुरामनगरी काराणेवाडी मैदान येथे आयोजित भाजपा चषक 2024 डे नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत मयूर स्पोर्ट्स कट्टा विजेता तर अवनी स्पोर्ट्स पेंडूर उपविजेता ठरला. आप्पा इलेव्हन चौके तृतीय तर डीसीसी वायरी चतुर्थ या सर्व संघाना मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम सामना सामनावीर कौस्तुभ मसुरकर, मालिकावीर कौस्तुभ मसुरकर, उत्कृष्ठ फलंदाज सुनील मालवणकर, उत्कृष्ठ गोलंदाज शेखर प्रभू व उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक प्रजेश रावले, उत्कृष्ठ यष्टीरक्षक हरेश बांदेकर यांना गौरवण्यात आले.
यावेळी दिलीप (दिपा) सावंत, आशिष हाडकर, राजन माणगावकर, संजय नाईक, शेखर फोंडेकर, आबा कामतेकर, प्रविण मिठबांवकर, ऋषी पेणकर, डॉ. रोहित डगरे, जगदीश चव्हाण, राजू भालेकर, सागर माळवदे, सुशील गावडे, अमित सावंत, सुमित सावंत, तेजस म्हाडगुत, अक्षय गावडे, मकरंद सावंत, ललित चव्हाण, मंदार मठकर, विनय मठकर, अनिकेत गावडे, पिंटू वालावलकर, मकरंद नातू, प्रनेश ढोलम, दर्शन खटावकर, पिंटू खाटावकर यांसह अन्य मान्यवर सहकारी उपस्थित होते.
कट्टा काराणेवाडी मैदान येथे भाजपा युवा मोर्चा मालवण आयोजित डे नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार संपन्न झाला. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या स्पर्धेस भेट देत शुभेच्छा दिल्यात. केंद्रीय मंत्री नारायणर राणे यांनी स्पर्धेच्या अंतिम दिवशी दर्शवलेली उपस्थिती दर्शवली सर्वांसाठी विशेष ठरली. ग्रामीण भागात देखील एवढे भव्य आयोजन पाहून त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तर पुढील वर्षाच्या स्पर्धेस स्वतः कडून प्रथम क्रमांक बक्षीस रू 3 लाख द्वितीय क्रमांक पारितोषिक रू 2 लाख व तृतीय पारितोषिक रु 1.5 लाख असे जाहीर करत आयोजकांना आणि खेळाडूंना सुखद धक्काच दिला. सर्व आयोजक भारावून गेले.












