▪️जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना
मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग चे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स.मालवण सभापती सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण, माजी सरपंच दत्ताराम उर्फ आपु आंबेरकर, उद्योजक सुरेश नेरुरकर, जेष्ठ कार्यकर्ते विलास पांजरी, कमलेश प्रभु, प्र.सरपंच शमिका वाडकर,उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण,बाबु वाडकर, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, पो.पा.निनाद माडये, माजी सैनिक जगदीश आंबेरकर, चेतन पांजरी पंडित पांजरी आदिसह क्रीकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री माजी सरपंच श्री आपु आंबेरकर श्री विलास पांजरी श्री सतिश वाळके श्री मुकेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून बाजार पेठ मित्र मंडळ च्या सहकार्याने आणि हनुमान क्रीडा मंडळ यांच्या मोलाच्या साथीतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम विजेत्या संघाला रुपये १५०००/कै. लक्ष्मी राजाराम आंबेरकर यांच्या स्मरणार्थ माजी सैनिक जगदीश आंबेरकर पुरस्कृत,व आकर्षक चषक पंकज वर्दम पुरस्कृत , द्वितीय पारितोषिक सभापती सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण पुरस्कृत रुपये १००००/, आकर्षक चषक पंकज वर्दम पुरस्कृत,तृतीय क्रमांक चषक व शिस्त बद्ध संघ चषक अमोल हिर्लेकर पुरस्कृत, मालीकाविर सायकल भाऊ कांदळकर पुरस्कृत, सामनाविर पंकज वर्दम पुरस्कृत, प्रत्येक षटकारास रुपये १००/मुकेश नार्वेकर, सर्व मॅन ऑफ द मॅच मनिष परब पुरस्कृत आहेत. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना भोजन व्यवस्था श्री विलास पांजरी पुरस्कृत, स्टेज व्यवस्था माजी सरपंच आपू आंबेकर,थंड पाणी व्यवस्था शिवराम वाडकर,मैदान व्यवस्था वाडकर बंधू, स्पर्धेसाठी लागणारे चेंडू अरुण घाडीगांवकर बेलाची वाडी, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक आकर्षक चषक मित्रमंडळ विरण बाजार, स्पोर्ट शूज नटराज फूटवेअर पुरस्कृत देण्यात येणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी अनिल कांदळकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.आभार माजी सरपंच आपू आंबेरकर यानी मानले.











