स्नेहज्योती मोफत निवासी अंध विद्यालय प्रवेश

खेड (प्रतिनिधी) कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव निवासी अंध विद्यालय असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयात प्रवेश सुरू झाला असून विद्यालय विद्यार्थ्यांना विनामूल्य सेवा उपलब्ध करून देत असल्याने अंध दिव्यागांच्या पालकानी या विद्यालयात आपल्या पाल्यांना पाठवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून द्यावी, असे आवाहन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी केलं आहे.
मंडणगड तालुक्यातील घराडी येथे गेली २१ वर्ष हे स्नेहज्योती विद्यालय चालवले जात आहे. येथे विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, नाश्ता, भोजन, वैद्यकीय सुविधा, गणवेश याची सोय आहे. शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच संगीत, हस्तकला, संगणक याचे उत्तम प्रशिक्षण देत आहेत.