मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दै. प्रहार आंगणेवाडी यात्राउत्सव पुरवणीचे प्रकाशन

मसुरे | प्रतिनिधी : दै. प्रहार आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्राउत्सव पुरवणीचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आंगणेवाडी येथे करण्यात आले.

 

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप नेते निलेश राणे, शिवसेना लोकसभा मतदारसंघ निरीक्षक आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रहार मसुरे प्रतिनिधी झुंजार पेडणेकर, मालवण प्रतिनिधी अमित खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, पराग खोत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.