माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील हेमाडपंथी बांधणीच्या पुरातन आमनायेश्वर मंदिरात दरवर्षी शिवरात्री उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.यावर्षीही या शिवरात्री उत्सवावेळी भरलेल्या जत्रोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी भाविकांनी शिवाचे दर्शन घेतले.शिवरात्री दिनी दिवसभर जत्रा झाली तर रात्री आमनायेश्वराचा मिरवणूक सोहळा होणार आहे.त्यानंतर पालखी सोहळा होईल.९ रोजी रात्री लळीता चे कीर्तन होईल तर १० ला सकाळी ११.३० वाजता महाप्रसाद होणार आहे.या महाप्रसादाचा खर्च कै.मारुती रत्नू गांगरकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती सरिता मारुती गांगरकर व परिवार करणार आहेत.तर उत्सवाचा सगळा खर्च श्री व सौ सुषमा प्रभाकर मोरे करणार आहेत.महाप्रसादासाठी उपस्थित राहावे
असे आवाहन करण्यात आले आहे.शिवाय १० रोजी रात्री १० वाजता श्री आमनायेश्वर प्रसादिक नाट्य मंडळ बुरंबाड पुरस्कृत श्री दत्त साई मंडळाचे दोन अंकी चौथरा हे नाटक होणार आहे.शिवरात्री उत्सव उत्तम रित्या होण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने अध्यक्ष संजय सहस्त्रबुद्धे,सचिव समीर शिंदे,खजिनदार शशिकांत घाणेकर,अजित मोरे,बबू कवळकर,बाळकृष्ण लिंगायत,अशोक लिंगायत आदी मेहनत घेत आहेत.









