खेड | प्रतिनिधी : खेड जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर असोसिएशनतर्फे सदस्यांच्या घरी अथवा क्लिनिकसह स्वच्छता व इतर घरकाम करणाऱ्या मदतनीस महिलांचा असोसिएशनमार्फत सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी गौरवमूर्तीचे कौतुक केले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्याम गिल्डा, सचिव डॉ. आदेश भोसले, कोषाध्यक्ष डॉ. सिद्धेश चिखले, डॉ. दीपक मोरे, डॉ. नीलेश भोसले, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. फरहाना अलवी, डॉ. आकांक्षा भोसले, डॉ. शमिका तलाठी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आदेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.










