खेड (प्रतिनिधी) खेड रोटरी क्लबतर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भरणे- बाईतवाडी येथील रोटरी स्कूलमध्ये आत्माराम शंकर चिखले स्मृती तालुकास्तरीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यास ४००१ रूपये, उपविजेत्यास ३००१ रूपये, तृतीय क्रमांकास १००१ रूपये, सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, कलाकार पुरुष-स्त्री, सहकलाकार पुरुष – स्त्री, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. वरूण मोदी, सचिव मंदार संसारे, प्रकल्पप्रमुख पराग चिखले आदी प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











