रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरातील माळनाका येथे भरदिवसा परप्रांतियांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना गुरुवार 14 मार्च रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली. गुरुवारी पोलिस अधिक्षक कार्यालय व पोलिस वसाहत नुतन इमारतीच्या भूमीपूजनासाठी उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौर्यावर असताना शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी शासकिय विश्रामगृहाबाहेरच परप्रांतियांच्या दोन गटांत हाणामारी सुरु झाली. त्यांनी एकमेकांवर कोणत्यातरी हत्याराने वार केले. यात दोन ते तीन जण गंभिर जखमी झाल्याने त्यांना रिक्षेत बसवून रुग्णालयात उपचारांसाठी पाठवून दिले. परंतू यातील कोणीही जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झालेले नाही. आपल्यावर कारवाई होईल या भितीने त्यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात न जाता तिथून पोबारा केला







