सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचे लाभत आहे मार्गदर्शन..
वेंगुर्ले | दाजी नाईक : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या नीच क्रूर वृत्तीच्या औरंग्याने ४० दिवस यवन यातना, छळ करीत मारलं. त्याच प्रीत्यर्थ ही मुले फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच १० मार्च पासून ८ एप्रिल २०२४ असा संपूर्ण एक महिना आपल्या धाकल्या धन्याचं म्हणजेच शंभूराजांच्या बलिदानाच सुतक सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक पाळत आहेत.

यामध्ये समर्थ कोळी, सुयश वाघमारे, श्रावणी गोकाककर, केतक नळेकर, प्रणव नळेकर, समर्थ कोचरेकर, सुयेल जाधव, संजय प्रजापती, ओजस परब, मानस परब, यशराज कोयंडे, प्रज्वल कोयंडे तसेच मठ कावलेवाडी येथे प्रथमेश नाईक, तेजस देसाई, साहिल परब, मयूर परब, ओंकार कावले, सचिन कावले हे सर्व निस्वार्थ बलिदान मास पाळत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे आजच्या फॅशनच्या युगात सुद्धा श्रावणी गोकाककर ही ताई सर्वस्व निश्चयाने पायात चप्पल न घालता बलिदान मास पाळत आहे.
या सर्वांनी संपूर्ण एक महिना पायात चप्पल न घालणे, चहा गोड पदार्थ न खाणे, शुभ प्रसंग टाळणे या गोष्टींचा त्याग केला आहे. तसेच दररोज सायंकाळी ७:३० वाजता मठ कावलेवाडी व माणिक चौक येथे महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावून व शंभूराजेंना पुष्प अर्पण करुन श्री संभाजीहृदय श्लोक म्हणून त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितला जातो व ध्येय मंत्र, प्रेरणामंत्र म्हणतात.
ही मुले हे सर्व का करत आहेत?
काय मिळणार हे सगळं करुन ? हे सगळं करायचं बलिदान मास जगण्यासाठी कारण काल ज्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या मंदिरात देव, घरात देव्हारा आणि अंगणात तुळस, आई, बहीण, मुलगी, पत्नी यांच्या कपाळावर कुंकु आहे, आज जे आपण हिंदू म्हणून जगतोय कारण आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी जे भोगंलय ते कुणीच केल नसेल,याची जाणीव प्रत्येक हिंदूला हवी ह्या मुलांची प्रेरणा घेऊन असंख्य मुलांनी बलिदान मास पाळला पाहिजे आणि सध्या ही काळाची गरज आहे,असे या मुलांचे म्हणणे आहे.












