खेड मधील भाजी विक्रेते राहुल जोध यांचे आकस्मिक निधन

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील चिंचघर – प्रभुवाडी येथील राहुल राजाराम जोध  यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी  १९ मार्च रोजी रात्री  आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
दिवंगत राहुल जोध हे शहरातील भाऊ‌साहेब पाटणे व्यापारी संकुल याठिकाणी भाजीविक्रेत्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे करीत होते. सदा हसत‌मुख व सर्वांशी प्रेमळपणाने वागणाऱ्या राहुल यांचे आकस्मिक निधन झाल्याने भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलातील सर्व व्यावसायिकांनी शोक व्यक्त करून बुधवारी व्यापारी संकुल बंद ठेवून त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी झाले. त्यांच्या मृतदेहावर २० मार्च रोजी दुपारी १ वाजता चिंचघर – प्रभुवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.