खेडमध्ये ‘संगीत पौर्णिमा’ कार्यक्रम उत्साहात पार

खेड (प्रतिनिधी) :
स्वरप्रेरणा संगीत कला क्रीडा संस्था, खेड यांच्या वतीने त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त ‘संगीत पौर्णिमा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन खेड नगरपालिकेच्या अॅक्टिव्हिटी सेंटर येथे बुधवारी सायंकाळी करण्यात आले होते. संस्थेचे एस. डी. शिर्के हे प्रमुख आयोजक म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
हा कार्यक्रम प्रत्येक कलाकारांसाठी, होतकरू गायक यांना व्यासपीठ मिळवून देणारा असल्याने या गायक कलाकारांना संगीत पौर्णिमेच्या निमित्ताने आपली कला सादर करण्याची एक संधी मिळाली. उत्स्फूर्त पणे अनेक गायकानी कराओके माध्यमातून आपली गायकी सादर केली.
कोणतीही स्पर्धा नसल्याने सर्व गायक कलाकार कुणालाच प्रतिस्पर्धी मानत नव्हते. तर सह कलाकार मानून अत्यंत बहारदार संगीत मैफिलीत आपली कला सादर केल्याने कार्यक्रम रंगतदार होईल असे या प्रसंगी उदघाटक उत्तमकुमार जैन यानी बोलताना सांगितले. या कार्यक्रमात विविध गायक-गायिकांनी भक्तिगीत, भावगीत, भजन, गझल अशा विविध संगीत प्रकारांचे मनोहारी सादरीकरण करून प्रेक्षकांना सुरेल मैफलीचा आनंद दिला. सुरांच्या लयबद्धतेने आणि कलाकारांच्या रसाळ सादरीकरणाने सभागृहात संगीताचा मनोहारी वातावरण रंगले. या प्रसंगी विधितज्ञ श्री. हेमंत वडके, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता वडके, सुवर्णा सद्रे, फारूक शेख, मकसूद मुल्ला, डॉ. किशोर शेळके आणि संदीप म्हसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांनी . संस्था तसेच कलाकारांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे कला-संस्कृती जपण्यास मोठी मदत होते, असे मत व्यक्त केले.
उत्स्फूर्त गायक आणी साचेबद्ध कार्यक्रम नसतानाही कोणताही गोंधळ न आणता योग्य सुसूत्रता आणत आणी असंख्य रंगातदार किस्से सांगत उत्तमकुमार जैन यांनी कार्यक्रम रंगतदार केलाच पण प्रेक्षकांना एकच जागेवर खिळवून ठेवले.