खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. दिवसभर खंडित होणाऱ्या सेवेमुळे ऐन शिमगोत्सवासह रमजान महिन्यात ग्राहकांची गैरसोय होत आहे.
बीएसएनएल सेवेचे पुरते तीनतेरावाजल्यानंतर खाडीपट्ट्यातील ग्राहकांनी बीएसएनएलकडे पाठ फिरवत खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा खरेदी केली. सुरुवातीला चांगली सेवा दिल्यानंतर आता या कंपन्यांची सेवाही बिघडल्याचे दिसून येत आहे. खासगी मोबाईल कंपन्यांनी सेवेत सुरळीतपणा न आणल्यास सेवाच पूर्णपणे बंद करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुराद अफवारे यांनी दिला आहे.











