स्टँडर्ड चार्टर्ड बॅकेचे सहकार्य
शिरगाव ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेतील सुसज्ज प्रस्तावित प्रसाधनगृह इमारतीचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच
नूतनीकरण केलेल्या या प्रशालेच्या इमारतीस रंगरंगोटीचा शुभारंभही करण्यात आला.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेची इमारत नूतनीकरण व मुलभूत भौतिक सुविधा सोडविण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थी प्रसाधनगृहासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बॅक मुंबई या बँकेमार्फत आर्थिक सहकार्य लाभले.या प्रसाधनगृहाच्या इमारतीचे भूमिपुजन या बॅकेचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रशालेला रंगरंगोटीचाही शुभारंभ करण्यात आला.यावेळी त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बॅकेचे अधिकारी मनिष सिंग ( हेड ऑफ प्राॅपर्टी- द.आशिया व ५ देश) , कर्नल आश्विनी सिंग ( हेड ऑफ सिक्युरिटी- इंडिया), मेजर डि.एस राव ( हेड ऑफ सिक्युरिटी- आशिया) ,हितेंद्र मेंडन( हेड ऑफ रिस्क-आशिया),माधवी मॅडम ( प्राॅपर्टी मॅनेजर-वेस्ट रिझन), मोनिका मॅडम ( सेक्रेटरी-द.हेड ऑफ प्राॅपर्टी ) व किशोर लाड (बिझनेस कम्युनिटी- साऊथ आशिया) या सर्व मान्यवरांचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावैळी मनिश सिंग यांनी प्रशालेच्या व संस्थेच्या कामाबाबत प्रशंसा केली.व उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच कर्नल अश्विनी सिंग,मेजर डी.एस. राव, हितेंद्र मेंडन, माधवी व मोनिका मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले .
या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी बॅकेने या प्रशालोसाठी आर्थिक, भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने आभार मानले. सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांनी प्रस्तावतेतून या प्रशालेसाठी या बँकेमार्फत केलेल्या सर्व कामाची व आर्थिक सहकार्याची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील भरणकर यांनी केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी वरील उपस्थित मान्यवरांसह स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, मुख्याध्यापक माणिक वंजारे, सुनील गावकर, सत्यवान भोगले, डाॅ.प्रभाकर शेळके, पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर, संस्था सदस्य,केंद्र शाळा साळशीचे मुख्याध्यापक गंगाधर कदम, सर्व शिक्षक वर्ग, पालक ग्रामस्थ, विद्यार्थ्यां उपस्थित होते.












