खेड(प्रतिनिधी) शिमग्या साठी नालासोपारा ते खेड अशी जाणाऱ्या बस मध्ये शिरत असताना एका विवाहितेचे १ लाख ५९ हजार ९९४ रूपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २२ मार्च रोजी घडली होती या प्रकरणी ६ एप्रिल रोजी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
सौ.वनिता मिलिंद कदम वय ३७ वर्षे, व्यवसाय – गृहिणी, रा. रूम नम- बी./ १०४. गजगामिणी, को. ऑ. बी. सोसायटी, , मनवेलपाडा, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर, मुळ राहणार मु.पो. वडगाव, ता. खेड यांनी येथील पोलीस स्थान कात तक्रार दाखल केली आहे
यातील फिर्यादी या शिमगा सणानिमित्त आपले मुळ गावी वडगाव खेड येथे येण्यासाठी बस क्र- एन. एम. पी एल २६९४ या एस.टी बस ने नालासोपारा ते खेड असा प्रवास करत असताना त्यांच्या लेडीज पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले











