मालवण भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी केक कापून मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस केला साजरा

अमित खोत | मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी बुधवारी उत्साहात संपन्न झाला. मालवण तालुका भाजपाच्या महिला आघाडीने मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला.

 

यावेळी महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर, शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शहर सरचिटणीस महिमा मयेकर, ओबीसी सेल अध्यक्षा पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर तसेच कु. तुलसी चव्हाण, कु. खुशी मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.