एन एम एम एस परीक्षेत भडगाव हायस्कूलचे यश

स्वप्नील कदम l कुडाळ :डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती ( एन एम एम एस ) परीक्षेत कुडाळ तालुक्यातील कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक मधील कुमारी साक्षी गणेश सावंत हिने EWS प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांक व कुमार ऋषिकेश संजय शिंदे याचा N T -क गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 4 था क्रमांक मिळविला आहे. दोघांनाही प्रति वर्ष 12000 रुपये असे 4 वर्षाची 48000 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून पुढील शिक्षणाला हातभार लागणार आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत , संस्था सचिव श्री. संभाजी वळंजु, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. सचिन मुकुंद धुरी , पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.